पाच जणांना तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरूप काढले बाहेर
| अलिबाग | भारत रांजणकर |
मुरुड येथील समुद्रातून भरकटलेल्या गुजरातच्या बोटीतून खलाशांना सुखरूप बाहेर काढण्याची घटना ताजी असतानाच आज अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील समुद्र किनारी बंद पडलेल्या फिलिपाइन्स देशातील नौका बंद पडल्याने रात्री पासून अडकली होती. याची माहिती मिळताच तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर च्या सहायाने त्यातील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले.

आज पहाटे नवगाव समुद्र किनारी एक बोट अडकल्याची घटना घडली. सदर बोट फिलिपाईन्स देशातील असल्याची माहिती मिळाली. समुद्रातील वादळी वाऱ्यात या बोटीचे इंजिन बंद पडल्याने ती भरकटत नवगाव येथे पोहचली. या घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरने या बोटीतून पाच इसमाना सुरक्षितरित्या बाहेर काढले.