पेणमध्ये आज राजकीय भूकंप

काँग्रेस, राष्ट्रवादीचे, भाजप नेते शिवबंधन बांधणार
| पेण | प्रतिनिधी |
आगामी काळात होणार्‍या पेण नगरपालिका आणि पेण अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पेणमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी ( 6 फेब्रुवारी) तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील नेेतेमंडळी ठाकरे यांच्या शिवसेनेते प्रवेश करणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त कृषीवलला प्राप्त झालेले आहे. पेण नगरपालिकेची निवडणूक केव्हा ही जाहीर होईल. परंतु, अनेक हवशे नवशे इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांनी पेण येथील पेण अर्बंन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे ठरवले जर निवडणूक लढवायची असेल तर उमेदवारांना कोणत्या तरी राजकीय पक्षाची कवचकुंडले बरोबर असणे गरजेचे आहे. त्यासाठी धारकर यांनी सेवानिवृत्त मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जीवन पाटील यांची मदत घेऊन शिवसेना नेते अ‍ॅड.अनिल परब यांच्याशी संधान बांधून आपल्या समर्थकांना शिवबंधन बांधण्यासाठी प्रवृत्त केले.

त्याचीच प्रचिती सोमवारी येणार आहे. पेणमध्ये आजी-माजी नगरसेवकांचा पक्ष कार्यक्रम होणार आहे. मात्र, कार्यक्रमाला गर्दी जमा करता येईल की नाही याबाबत साशंकता असल्याने कार्यक्रम बंदिस्त हॉलमध्ये होणार आहे. या पक्ष प्रवेशामध्ये भाजपच्या आमदारांचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादीचे नगरसेवकांचा समावेश आहे. आता कार्यक्रमासाठी किती गर्दी होते यावरून पक्ष प्रवेश दणक्यात झाला की फुसकाबार निघाला हे सोमवारी दिसून येईल. परंतु महत्वाची म्हणजे आजपर्यंत राजकीय पक्षाचा प्रवेश पाहिल्यास नेते मंडळी टुणकण उडी मारुन या पक्षातून त्या पक्षात जात असतात आणि त्यांची शेपूट पकडून कार्यकर्ते मागे मागे जात असतात. मात्र, इथे आपल्याला प्रमुख नेते मंडळी पडदयाच्या आड असल्याचे वाटत आहेत. अथवा राजकीय पक्षामध्ये या नेते मंडळींना स्थान नाही. अस म्हटल्यास वावग ठरणार हा फक्त हवशे नवशे उमेदवारी करणार्‍या कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे. त्यामुळे सेनेचा हा जाहीर प्रवेश उल्लेखनीय व आठवणीत राहण्यासारखा आहे. हा पक्ष प्रवेश कसा ही झाला तरी याचा फटका भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मोठा बसणार आहे. या पक्ष प्रवेशामध्ये शेकाप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पहायला मिळणार आहेत निश्‍चित.

Exit mobile version