| नवीन पनवेल | वार्ताहर |
बार मध्ये असलेला मुलीला शेंगदाणा मारल्याने खांदा कॉलनी येथे राहणाऱ्या 48 वर्षीय राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
पनवेल मधील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला लेडीज बार मध्ये मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेला पदाधिकारी त्याच्या मित्रासोबत पनवेल तालुक्यातील मून लाईट बार (कोळखे) मध्ये मंगळवारी (दि. 27) रोजी दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी काही महिला बारमध्ये गाण्यावर नृत्य करत होत्या. बार मध्ये मद्य प्यायल्यानंतर या पदाधिकाऱ्याने बारबालेच्या दिशेने शेंगदाणा भिरकावला. यावेळी संतप्त झालेल्या बारमालकाने बाउन्सर आणि वेटरच्या सहाय्याने त्याला मारहाण केल्याची घटना पनवेल मध्ये मंगळवारी रात्री घडली. या मारहाणीत हा पदाधिकारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी देखील असे प्रकार अनेकदा बारमध्ये घडलेले आहेत. मात्र काही जण आपले नाव येऊ नये आणि बदनामी होऊ नये यासाठी तक्रार करत नाहीत.
पनवेल तालुक्यातील बार मध्ये बलात्काराच्या देखील घटना घडलेल्या आहेत तर काही महिन्यांपूर्वी बार मध्ये गोळीबार देखील करण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी झालेल्या या मारहाणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करता कामा नये.