पारंगखार येथील राम मंदिरात सौरऊर्जा पॅनलचे लोकार्पण
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील पारंगखार गावातील राम मंदिरात सौरऊर्जा पॅनलचे शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांनी पारंगखार गावातील कार्यकर्त्यांना मंदिरात सौरऊर्जा पॅनल स्वखर्चाने बसवून देण्याचे वचन दिले होते, त्याची त्यांनी वचनपूर्ती केली.
दरम्यान, याआधी पारंगखार गावात चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच नेत्रचिकित्सा करुन गरीब व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून, गरजूंना स्वखर्चाने आर्थिक मदतदेखील करण्यात आलेली आहे. खास गणपतीसाठी गावाला येणाऱ्या चाकरमान्यांना तीन बस देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महिलांसाठी महिला कार्यशाळेचे नूतनीकरण करण्याचे वचन दिले आहे. यापूर्वी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली असल्याने आता देलेले वचनही ताई पूर्ण करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आपल्या भाषणात चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी आणि सासऱ्यांनी मला एक गोष्ट सांगितली की, जे आपण कमवतो त्यातील 25 टक्के आपण गरीबांना दिले पाहिजे. ते मी करते, त्याचा मला आनंद आहे. मी कधी घाणेरडे राजकारण केले नाही. कारण, ते मला आवडत नाही. गावातील विकासकामे करायची असतील, तर शेकापशिवाय पर्याय नाही.
यावेळी मजदूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीनाथ गंभे, व्हाईस चेअरमन विकास भायतांडेल, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, कोकबन ग्रामपंचायत सदस्या अरुणा तांबडे, कृषी बाजार समिती संचालक विनायक धामणे, विलास म्हात्रे, आत्माराम कासारे, संतोष दिवकर, शंकर दिवकर, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर शाबासकर, पांडुरंग ठाकूर, रामनाथ घाग, मंगेश म्हात्रे, संतोष घाग, मनोहर गुंडे, चांगुणा गुंडे, दर्शना गायकर तसेच असंख्य कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग तांबडे यांनी केले.