रस्त्यासाठी आंदोलनाचा पवित्रा

नऊ गाव ग्रामस्थांची संघर्ष समितीची स्थापना
| पाली | वार्ताहर |
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या पाच्छापूर फाटा ते दर्यागाव रस्त्याची गांभीर्याने दखल घेत रस्त्याचे काम शासनाकडून तातडीने करण्यात यावे यासाठी या मार्गावरून प्रवास करणार्‍या नऊ गाव ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.

दरम्यान, पाच्छापूर फाटा ते दर्यागाव रस्ता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. रस्त्यासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि.8 रोजी दुपारी 12 वा. सोमजाई माता मंदिर पाच्छापूर येथे नऊ गाव ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला या मार्गावरून प्रवास करणारे ग्रामस्थ, दूध व्यावसायिक, विद्यार्थी, त्याचप्रमाणे सुधागड किल्ल्यावर येणारे पर्यटक, गडप्रेमी, शिवप्रेमी, नोकरदार, पत्रकार आदींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version