। रोहा । वार्ताहर ।
तालुक्यातील तिसे गावात गतवर्षी दरड कोसळून मोठे नुकसान झाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ आजही भीतीच्या सावटाखाली आहेत. या घटनेनंतर गावाला दरडप्रणव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. यंदाही तिसे गावात दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी, घटनास्थळी भेट देत पाहणी केली, तसेच ग्रामस्थांना धीर दिला. गावातील नागरिकांसोबत मंदिर सभागृहात बैठक घेत मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, कोलाड पोलिस अधिकारी नितीन मोहिते, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. आर. बागुल आदी उपस्थित होते.तिसे गावात संरक्षक भिंत बांधण्यासाठी गतवर्षी एक कोटी 74 लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन पुढच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी काम नक्कीच मार्गी लागेल, अशी ग्वाही देत संबंधित अधिकार्यांना डॉ. जावळे यांनी आदेश दिले आहेत. त्यांनी संजय गांधीनगर पूरग्रस्त घराची पाहणी केली.
दरडग्रस्त तिसे गावात संरक्षक भिंत बांधणार
