सव्वा लाखाची रोकड जप्त

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग, आचारसंहिता पथकांतर्गत शनिवारी (दि.16) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धानसर टोल नाका येथे सव्वा लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.

कल्याण शिळफटा ते कळंबोलीच्या दिशेने जाणार्‍या धानसर टोल नाका येथे रोडवरून जाणार्‍या पांढर्‍या रंगाची क्रेटा कंपनीची चारचाकी गाडीला थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी या गाडीत असलेल्या तपकीरी रंगाच्या बॅगमध्ये 1 लाख 26 हजार 500 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. स्थिर सर्वेक्षण पथक क्र. 01 मार्फत ही रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई पनवेले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Exit mobile version