पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ

भारत-आफ्रिका सामना रद्द

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचा अखेर निकाल लागला आहे. एकही बॉल न खेळता आणि नाणेफेकही न होता या सामन्याचा निकाल लागला. पावसानं हजेरी लावल्यानं सामना रद्द करावा लागला. डर्बनमध्ये पाऊस सुरु असल्यानं हा निर्णय घ्यावा लागला.

भारतीय प्रमाण वेळेनुसार साडेसात वाजता सामना सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र, पावसामुळं नाणेफेकदेखील झाली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेचा निकाल आता दोन सामन्यांमध्येच लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत बीसीसीआयनं भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे दिली आहे. आता पुढील दोन सामने दि.12 व14 डिसेंबर रोजी होतील.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळं लांबणीवर पडला होता. पावसामुळं सामना सुरु होण्यास उशीर होत होता. सामन्यातील षटकंदेखील कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पाऊस सुरु राहिल्यानं अखेर भारतीय प्रमाण वेळेनुसार 9.25 मिनिटांनी मॅच रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.

Exit mobile version