पारगावच्या पुनर्वसनासाठी महसूलमंत्र्यांना निवेदन

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल दि.05(संजय कदम): तालुक्यातील पारगाव, कोल्ही, डुंगी, कोल्ही आदिवासीवाडी या भागातील पुनर्वसन पुनःस्थापनेबाबत ठोस निर्णय शासनाने घ्यावा अश्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानसभेत भेट घेऊन केली.

विखे पाटील यांची विधान भवन मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ग्रामस्थ बाळाराम नाईक यांनी ग्रामस्थांच्यावतीने भेट घेऊन पारगाव गाव पुनर्वसन पुन स्थापनेबाबत बोलताना ग्रुप ग्रामपंचायत पारगांव हद्दीतील पारगाव गावात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दगड मातीच्या भरावामुळे सन 2017 पासून ते आजतगायत पावसाचे पाणी साचून गावात पूरस्थिती निर्माण होते व घराघरात पाणी साचून ग्रामस्थाने आर्थिक नुकसान होते. तसेच उन्हाळयात ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेले आहेत. याबाबत वारंवार दरवर्षी पंचनामे करण्यात येत आहेत. पुनर्वसन बाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आपल्या मार्फत सिडको सोबत ग्रामस्थांची सभा आयोजित करण्यात यावी या संदर्भात चर्चा करून या मागणीचे निवेदन दिले. या मागणीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या विषयासंदर्भात बैठक आयोजित करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यानी दिले.

Exit mobile version