पेणमध्ये वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद

। पेण । प्रतिनिधी ।

पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पहिली ते चौथीच्या शेकडो विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यावेळी विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी पहायला मिळाले. यानिमित्ताने निबंध व चित्रकला स्पर्धेचेदेखील आयोजन केले होते.

स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू यांच्यासह बाळासाहेब जोशी, प्रशांत ओक, समिर साने उपस्थित होते. स्पर्धा संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, अपर्णा वाघमारे, सुषमा साखरे, कविता पेडणेकर, मिलींद वारगुडे, धनाजी घरत, गीता म्हात्रे, कमला पाटील, रुचा परांजपे, अश्‍विनी पाटील, प्रतिक्षा म्हात्रे, रुपाली पाटील, रुचिरा डोंगरे यांनी विशेष मेहन घेतली.

Exit mobile version