। खरोशी । वार्ताहर ।
एल्बोबॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाने पिंपरी चिंचवड पुणे येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूल येथे राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनमधील शिहान म्हात्रे आणि सेन्साय विनायक पाटील ह्यांच्याकडे एल्बोबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेले संस्कार शिर्के, अयुष पाटील, अराध्य साळवी, अर्थव पाटील, निशिगंध पाटील, संस्कार यादव, रितुल म्हात्रे, रविना म्हात्रे ह्यानी सुवर्ण पदक संपादित केले. तसेच मोहीत कोठेकर, अभिषेक वर्तळे, स्वरांगी घैसास, साक्षी पाटील, तेजस्विनी ओवळे ह्यांनी सिल्व्हर मेडल संपादित केले. तर स्वराज साळेकर,आर्य कुवळेकर, रितेष पवार, स्मित म्हात्रे, परम झिंजे, ओमकार पाटील, यश म्हात्रे, आर्यदीप झिंजे ह्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावून पेण तालुक्याचे नाव उंचावले.