| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील देवळी बसथांब्यासमोर भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. महाडहून मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहन हयगयीने व अतिवेगाने चालवून महिलेला धडक दिली. अपघातात महिलेचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून डोके व हनुवटीला गंभीर दुखापत झाली आहे. दुचाकीस्वारालाही किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला सहायक फौजदार कांबळे तपास करीत आहेत.






