। रेवदंडा । वार्ताहर ।
दिवंगत जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या स्मरणार्थ एकपात्री अभिनव स्पर्धेचा खुला स्पर्धात्मक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेला कलाकार व रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. अलिबाग तालुक्यातील चौल भाटगल्ली येथील मोरया कला अकादमीत गुरूवारी (दि.1) एकपात्री अभिनय स्पर्धेचा शुभारंभ मृगज बिजुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या एकपात्री अभिनय स्पर्धा तिन गटांत घेण्यात आली. त्यातील छोट्या व मधल्या गटात प्रत्येकी आठ स्पर्धक व खुल्या गटात 15 स्पर्धक असे एकूण 31 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत परिक्षक म्हणून सुनिल शानबाग व सार्थक चासकर यांनी काम पाहिले. तर, स्पर्धेचे प्रास्ताविक अनिल म्हात्रे व निवेदन गायत्री तुळपुळे यांनी केले.
या स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक दुर्वा झावरे व द्वितीय क्रमांक अर्थव शिंदे यांनी पटकावला. दुसर्या गटात प्रथम क्रमांक तपस्या पाटील, द्वितीय क्रमांक आराध्य पाटील, तृतीय क्रमांक अनन्या परभाळे व उत्तेजनार्थ नव्या वर्तक यांनी बहुमान मिळवला. तसेच, तीसर्या गटातप्रथम क्रमांक यश कांरडे, द्वितीय क्रमांक श्रुती नाईक तर तृतीय क्रमांक अभिषेक पाटील यांनी मिळविला. यावेळी कला दिग्दर्शक विनायक काटकर, परिक्षक जेष्ठ रंगकर्मी सुनिल शानबाग, सार्थक चासकर, निलेश खोत, आयोजक प्रकाश कवळे, सुधाकर मेस्त्री व नाट्य रसिक प्रेक्षक यांची उपस्थिती होती.