| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली वसाहत आणि लोखंड बाजार चौकातील भल्या मोठ्या खड्ड्यात रविवारी दुपारी तीन आसनी रिक्षाचे पुढचे चाक रुतले. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे रिक्षाचालकासह प्रवाशांना अथक परिश्रम केल्यानंतर रिक्षा खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आले. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही येथील पाणी साचण्याची समस्या दूर झालेली नाही. संबंधित रस्ते आणि उड्डाण पूल बांधणार्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी प्रशासनाने पावसाळी पाणी साचण्याची समस्या ध्यानात न घेता येथे पावसाळी पाण्याच्या निचर्यासाठी नियोजन केले नाही. पनवेल पालिकेने येथे साचलेले पाणी काढण्यासाठी मोटार पंप लावलेला आहे.