खातेवाटप रखडलं! महत्वाची दोन कारणं आली समोर

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र खातेवाटप रखडलं आहे. या खातेवाटप रखडण्याची दोन कारणं समोर आली आहे. यातलं पहिलं कारण म्हणजे, शिंदे गट आणि भाजपमध्ये ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच खातेवाटप रखडल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही गटांना ऊर्जा आणि उद्योग ही दोन खाती हवी आहेत. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून आग्रह सुरु आहे. यावर तोडगा निघेल तेव्हाच खातेवाटप मार्गी लागेल असं सांगितलं जात आहे. 40 दिवस विस्ताराचा तिढा आणि आता खातेवाटप किती दिवस रखडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच ऊर्जा आणि उद्योग ही दोन महत्त्वाची खाती कुणाला मिळणार? याकडेही आता लक्ष लागून आहे.

विस्तार होऊन तीन दिवस होऊनही मंत्र्यांना खाती मिळालेलीच नाहीत. मात्र हा खातेवाटप पुढील दोन दिवसात होईल, असा विश्‍वास नवनिर्वाचित मंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे. जो काम करू शकेल अशांनाच मंत्रिपद दिल्याचं ते म्हणाले. 20 मंत्री आणि जास्त खाती असल्यानं वाटपाला वेळ लागतोय. कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणार्‍यांना कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय, असंही गावितांनी सांगितलं.

Exit mobile version