पाशिलकर यांनी फुलवली फुल शेती
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील गिरणे हे गाव व्यवसाय व शेतीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. या गावातील शेतकरी पारंपारिक व आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शेतीत विविध प्रयोग करत आहेत. यातच गावचे अध्यक्ष व बांधकाम उद्योजक जयेंद्र पाशिलकर यांनी मोठ्या मेहनतीने त्यांच्या दहा गुंठे शेतात फुलशेती फुलवली असून तरूणांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
तळा तालुक्यातील गिरणे हे गाव चवळी, वाल, मटकी अशा कडधान्यांची शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. गावातील शेतकरी पारंपारिक व आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शेतात विविध प्रयोग करीत असतात. यातील उद्योजक जयेंद्र पाशिलकर यांनी यांच्या 10 गुंठे शेतीत फुलशेती फुलवली आहे. या शेतीमधे 2 हजार झेंडूच्या विविध फुलांची रोपे लावली आहेत. तसेच, जी पिके येथे होत नाहीत अशी अनेक पिके घेण्याचा निश्चय करून गेल्या वर्षी प्रायोगिकत्वावरती थोड्या भागात त्यांनी केली होती. यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळाले होते. यावर्षी दहा गुंठ्यांत 200 मिरचीची रोपे लावली आहेत. याचबरोबर मका, कल्याणी आलू, माठ, कोथिंबीर, वांगी, पालक, भेंडी अशा रोपांची लागवड केली असून आता ही रोपे चांगली जोमाने येऊन चांगले उत्पन्न देत आहेत. तसेच, या रोपांना जास्त प्रमाणात शेणखत व योग्य प्रमाणत रासायनिक खताचा वापर करण्यात आला आहे. यामुळ दोन दिवसा आड फुले मिळण्यास सुरू झाले आहे. प्रत्येक तरूण शेतकर्यांनी जयेंद्र पाशिलकर यांचा आदर्श घेत अत्याधुनिक पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पन्न घेता येईल.