। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळ ते कॉलेज ऑफ होम सायन्स आणि निर्मला निकेतन यांच्या माध्यमातून परसबाग फुलवण्याचा उपक्रम सुरू आहे. भालिवडी येथील शासकीय आश्रमशाळेत परसबाग फुलवल्यामुळे या आश्रमशाळेतील विद्यार्थींना ताजा भाजीपाला मिळू शकणार आहे.
कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन यांच्या मार्फत किचन गार्डनच्या माध्यमातून अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत शासकीय आश्रमशाळा भालीवडी येथील परिसरात परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेत शिराली, घोसाळी, डांगर भोपळा, दुधी या वेलवर्गीय भाज्या व भेंडी, हिरवा माठ, मुळा आदी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. या परसबाग मध्ये तयार झालेली भाजी उपलब्धतेनुसार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणामध्ये दिली जाते.







