धावत्या कारने घेतला पेट

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

उरण फाटा रस्यावर भरदिवसा धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.23) घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने कारबाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच नेरूळ आणि सीबीडी बेलापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दोन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र, या दुर्घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, उरण फाटा मार्गावरील बेलापूर-नेरूळ मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Exit mobile version