। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात एका धावत्या कारला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि कार जाळून खाक झाली. सुदैवाने कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत आग भडकण्यापूर्वीच गाडीतून उडी घेतल्याने ते थोडक्यात बचावले. बोगद्यासारख्या बंदिस्त जागेत कारला आग लागल्यामुळे काही वेळातच संपूर्ण बोगद्यात धुराचे साम्राज्य पसरले. या धुरामुळे चालकांना समोरील रस्ता दिसणं बंद झालं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे बोगद्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सुरक्षेसाठी काही काळ वाहतूक थांबवण्यात आल्याने जवळपास 3 किमीपर्यंत वाहनांच्या लाबंच लाब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल दाखल होत मदतकार्य सुरु केले.






