| तळा । वार्ताहर ।
ज्येष्ठ नागरिक हा कुटुंबाचा आधारस्तंभ तर समाजाचा आरसा असतो असे प्रतिपादन जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले. ते महाड जेष्ठ नागरिक संघाच्या 19 व्या वर्धापन दिनी बोलत होते. यावेळी सुभाष शेठ, डॉ. प्रशांत पटवर्धन, अरुण मशेटे, डॉ. चंद्रकांत दोशी, शर्मिला धारप, संतोष शेठ, आनंदराव टमके, वडके, सुधीर शेठ, अ.वि जंगम, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, गांधी इंजिनियर, श्री टूमने यांच्यासह महिला पुरुष फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे स्थान उंचावण्यासाठी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक हा कुटुंबाचा आधारस्तंभ असून समाजाचा तो आरसा आहे. अशावेळी पाल्यांनी त्यांच्या वयोमानाचा विचार करून त्यांना तशी वागणूक दिली पाहिजे. ज्येष्ठ माणूस हा बालहट्ट प्रमाणे वागत असतो. त्यांच्या बाळ हटाकडे दुर्लक्ष करून त्यांना सकारात्मक वागणूक दिली पाहिजे. कारण ते देखील आपल्या कुटुंबातील एक महत्त्वाचे घटक आहेत. अशा प्रकारे जर त्यांना वागणूक मिळा तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. आणि खर्या अर्थाने त्यांचे जीवनमान सुखकर होईल. नाहीतर नटसम्राट नाटकातील अनुभव अनुभवण्यास नको. हे सांगताना जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या योजनाची माहिती त्याना दिली.
उदाहरणार्थ वृद्धाश्रम योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्यनिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र अशा योजना मधून सुविधा उपलब्ध होऊ शकतात. जसे एसटी प्रवास भाड्यात सवलत. शासकीय अनुदान. बँका, पोस्ट ,रेल्वे, दवाखाने येथे सवलती अशाप्रकारे शासन वृद्धाकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहे असे मुळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.