विहूर पुलावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच

। मुरूड । वार्ताहर ।
मुसळधार पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडले असून अपघातांची मालिका सुरुच आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अलिबाग-मुरुड राज्य मार्गावरील विहूर नदीवरील पुलाचा एक भाग वाहून गेला होता. त्या वेळी वाहतूक बंद पडली होती. या पुलावरील मोठं मोठे खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत.

डागडुजी करुन सा. बां. विभागाने एकेरी वाहतूक मजबुतीकरण आणि सुरु केली होती. मात्र, डांबरीकरण पावसाळा आला तरी झालेच नाही. पुलाच्या रस्त्यावरील संरक्षण भिंतीचे बांधकाम अजूनही झालेले नाही. उलट पुलावरील रस्त्यावर आधिक मोठे खड्डे पडून अपघात घडत आहेत. गुरुवारी सकाळी ज्युपिटर स्कुटी घेऊन जाणाऱ्या मुरुडच्या प्रीतम वाळंज या युवतीची पुलावर स्कुटी घसरुन ती जखमी झाली असून जीवघेणा मोठा प्रसंग सुदैवाने टळला आहे. अधिक पाऊस पडल्यास या पुलाचा भराव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रतिक्रिया येथिल नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

अशीच परिस्थिती काशीद – सर्वे गावानजिकच्या चिकणी नदीवरील पुलाची असून गेल्या वर्षी पुलाची संरक्षक भिंत वाहून गेली होती. त्याची डागडुजी केली असली तरी नदीतील पाण्याचा वेग पाहता तो पूल किती काळापर्यंत तग धरेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version