अंदमान बेटाजवळील समुद्रात जहाज बुडालं

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अंदमान बेटाजवळील समुद्रात भीषण दुर्घटना घडली आहे. अंदमानच्या समुद्रात एक जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास अडीचशे लोकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जहाजात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. या भीषण घटनेने अंदमान बेटावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशच्या किनाऱ्यावरून निघालेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले जहाज मलेशियाकडे जात असल्याचं वृत्त आहे. खवळलेल्या समुद्रात आणि वेगवान वाऱ्यामध्ये जहाज सापडलं. हे जहाज 9 एप्रिल रोजी उलटल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत केवळ 9 जणांची सुटका करण्यात यश आलं आहे.

म्यानमारमधून रोहिंग्या समाजाचे हजारो लोक इतरत्र स्थलांतरित होत असतात. ही लोक म्यानमारमधील जाचाला कंटाळलेले लोक जीव धोक्यात घालून दुसऱ्या देशात जातात. स्थलांतरित लोक दुसऱ्या देशात जाण्यासाठी नेहमी एखाद्या साधारण जहाजाचा वापर करतात. म्यानमारच्या रखाइन राज्यातील सैन्य आणि रोहिंग्या समाजाच्या विद्रोही समूहाशी नेहमी वाद होत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, 280 लोक जहाजात होते. 4 एप्रिल रोजी बांगलादेशातून हे जहाज निघालं’. या भीषण घटनेने अंदमान बेटावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे.

Exit mobile version