। मुंबई । वृत्तसंस्था ।
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षप्रवेश करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या गेल्या आहेत. येत्या 3 दिवसात अभिनेत्री दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्या बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती घेण्यासाठी मी तयार आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे आणि रश्मी ठाकरेंवर टीकास्त्र
वर्षा बंगल्याबाहेर माध्यमांशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर दीपाली सय्यद यांनी टीका केली. मुंबई महानगरपालिकेचे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नसल्याची खंत रश्मी वहिंनीना असल्याचे टीकास्त्र दीपाली यांनी सोडले.