वाहतूक पोलीसांकडून माणुसकीचे दर्शन

| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याचे प्रवेशव्दार म्हणून चार फाटयाची ओळख आहे, या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद दरेकर, पोलीस हवालदार दिपक साटाटे, महिला पोलीस शिपाई मनाली सोनावणे, पोलीस शिपाई गणेश बो-हाडे आपली सेवा, कर्तव्य बजावत रस्त्यावरील खड्डे बुजवून माणुसकी दर्शन घडविले. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत उत्साहात साजरा करताना नागरिकांच्या वाहतूकीच्या कोंडीचे विघ्न नको म्हणून कर्जत चार फाटा येथे असणारे वाहतूक पोलीस कर्मचारी कन्ट्रक्शन कंपनीला विनंती करून त्यांच्या सहकार्याने चार फाटा ते मुरबाड कडे जाणार्‍या रस्त्यावरील रेल्वे ब्रिज व परिसरातील खड्डे सिमेंट कॉक्रीटच्या सहाय्याने भरले व माणुसकीचे दर्शन घडविले आहे. जे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केले पाहिजे ते काम विनंती करून वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी केले आहे.

Exit mobile version