। पनवेल। प्रतिनिधी ।
मुंबई- गोवा महामार्गावर पनवेल कडून पेणकडे जाणाऱ्या दिशेने रोडवर विठ्ठल कामत हॉटेलजवळ भरधाव जाणाऱ्या रिक्षाने रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत मुंब्रा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावर चिंचवण गांव जवळ कंटेनर चालकाने रात्रीच्या सुमारास त्याच्या ताब्यातील कंटेनर रस्त्याच्या मध्ये वाहतुकीस अडथळा होईल असा पार्किंग केला होता. यादरम्यान येणाऱ्या रिक्षाने या कंटेनरला धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक रफिक अन्सारी (40), फातीमा अन्सारी (20) यांचा जागीच मृत्यू झाला तर शहनाज अन्सारी (40), सुमया अन्सारी (9) हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.






