। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव ट्रेलरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण मृत झाला. त्याचा सहकारी जखमी आहे. इर्शाद अली शेख (35, रा.चेंबुुर) असे मृताचे नाव आहे, तर हिदायत अल्लाह शेख असे जखमीचे नाव आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. इर्शाद हा दुचाकीवरुन पनवेल येथून जुन्या पुणे मार्गावरुन डेरवलीकडे जात होता. त्यावेळी वैभव पेट्रोल पंपाजवळ कोळखे गाव येथे पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रेलरने धडक मारली.







