भरधाव ट्रक झोपडीत घुसला; 10 जणांना चिरडलं

| बुलढाणा | वृत्तसंस्था |
बुलढाण्यात नांदुरा-मलकापूर मार्गावर भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक भरधाव ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसला. ट्रकने झोपडीत झोपलेल्या 10 मजुरांना चिरडले असून या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले आहेत. तर 6 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सहा जखमींपैकी दोघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे सर्व मजूर महामार्गाच्या कामासाठी आले होते. रस्त्यालगतच त्यांची झोपडी होती. रात्री हे मजूर गाढ झोपेत असताना ट्रक त्यांच्या झोपडीत घुसला. पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version