ठाकरे गटाकडून तहसीलदारांना निवेदन

| म्हसळा | वार्ताहर |

राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावे आणि जलदगती न्यायालयात खटला दाखल व्हावा, यासाठी मंगळवारी बदलापूरकरांचा उद्रेक पाहायला मिळाला. याप्रकरणाचा म्हसळ्यातील ठाकरे सेनेकडूनही निषेध करण्यात आला असून महिलांना विशेष संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.

ठाकरे सेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी म्हसळा पोलिस ठाणे व म्हसळा तालुका दंडाधिकारी कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला. यावेळी श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ विलास करडे, तालुका महिला आघाडी रिमा महामूणकर, शहरप्रमुख विशाल सायकर, नदीम दफेदर, तालुका सल्लागार पांडुरंग सुतार आदी उपस्थित होते.

Exit mobile version