| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुका पदाधिकारी आणी शिवसैनिकांची सभा मध्यवर्ती तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वांनी एका मताने आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक पण उद्धवसाहेबांना साथ देणार, असा निर्धार केला. आ. भरत गोगावले यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले. परंतु, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याचे तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर यांनी यावेळी सांगितले.
सत्तापरिवर्तन हे या निसर्ग नियम असून, सत्ता आज आहे, उद्या नाही. पण, शिवसेनेचे संघटन व प्राबल्य राज्यात अजून वाढणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला अजून बहर येणार असल्याचे ठाम विश्वास माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी व्यक्त केला. यावेळी क्षेत्र संघटक ज्येष्ठ शिवसैनिक रवी लाड, गजानन शिंदे, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, विभाग प्रमुख हेमंत नाक्ती, प्रसाद बोर्ले, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, निशा पाटील, दीपाली कांबळे, पांडुरंग बने, गोट्या सावंत, राजेंद्र सावंत, आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.