। उरण । घन:श्याम कडू ।
जेएनपीएच्या दोन कामगार विश्वस्त पदासाठी 2 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात येणार होती. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय चीफ लेबर कमिशनर तेज बहादूर यांनी दि.2 ऑगस्ट रोजी जाहीर केलेली विश्वस्त पदाची निवडणूक काही तांत्रिक कारणामुळे स्थगित करीत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे कामगार संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
आधीच निवडणुकीसाठी विलंब झालेल्या जेएनपीए 2 कामगार विश्वस्त पदाची निवडणूक येत्या 2 ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. त्यामुळे सर्वच कामगार संघटना अधिकृत प्रचाराला लागल्या होत्या. यामध्ये एकूण 4 संघटनांनी निवडणूक रिंगणात उतरत प्रचार करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये जेएनपीटी कामगार एकटा संघटना, न्हावा शेवा बंदर (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन व शांती पटेल या संघटनांचा समावेश होता.