| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएल 2026 स्पर्धेच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ भिडले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखत बाजी मारली. या सामन्यात समीर रिझवीच्या वादळी खेळीने दिल्लीचा विजय सोपा झाला.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीची संधी दिली. हा सामना खेळण्यासाठी हार्दिक पांड्या फिट नसल्याने मुंबईचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने सांभाळले. मुंबईचे सलामिवीर रोहित शर्मा आणि रायल रिकेल्टन मैदानात उतरले. परंतु, दिल्लीने तिसऱ्याच षटकात दोन धक्के दिले. रायन रिकेल्टन (9) व तिलक वर्मा (0) स्वस्त्यात माघारी परतले. मात्र, रोहित शर्मा व सूर्या यांनी 39 चेंडूंत 53 धावांची भागीदारी पूर्ण केली. परंतु, चेंडू कव्हर्सच्या वरून मारण्याच्या प्रयत्नात रोहित (35) झेलबाद झाला. त्यानंतर शेरफान रुथरफोर्ड (5) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सूर्या एकाबाजूने मैदानता टिकून उभा होता आणि त्याने 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परंतु, तो 51 धावांवर पायचीत झाला. त्यानंतर नमन धीरने 28 धावांची खेळी करताना मुंबईला दीडशेपर्यंत पोहोचवले, परंतु 19व्या षटकात तो बाद झाला. तर, मिचेल सँटनर (18) व कॉर्बिन बॉश (11) यांच्या खेळीने मुंबईला 6 बाद 162 धावांपर्यंत पोहोचवले. कुलदीप यादव (10.33) सोडल्यास दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी 9 पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या. मुकेशने 2 महत्त्वाचे बळी घेतले. तर, लुंगी एनगिडी, अक्षर पटेल, विपराज निगम आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली आणि दीपक चहरच्या चौथ्या चेंडूवर के.एल. राहूल (1) झेलबाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने नितीश राणाला (0) पायचित कले. त्यानंतर पथून निसंका व इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी यांनी 49 चेंडूंत 66 धावांची भागीदारी करून दिल्लीला सावरले. मात्र, मिचेल सँटनरने निस्संकाला 44 धावांवर झेलबाद केले. त्यानंजतर रिझवीने 11व्या षटकात 4,4,6,6 अशा 20 धावा चोपल्या आणि पुढच्याच षटकात अर्धशतक देखील पूर्ण केले. तो 51 चेंडूंत 7 चौकार व 7 षटकारांसह 90 धावांवर बाद झाला. मात्र, त्याने दिल्लीच्या बाजूने सामना पूर्णपणे झुकवला. त्यानंतर मिलरने (21) हा सामना 18.1 षटकात संपवला आणि दिल्लीला 6 गडी राखून विजय मिळवून दिला.
राजधानीत रिझवी नावाचे वादळ
