खासदार बारणे यांना कोंडीत पकडण्याची रणनीती

वाघेरे-पाटील उचलणार पनवेल-उरण विधानसभा मतदार संघातील स्थानिकांचे प्रश्न

| पनवेल | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदार संघांतुन खासदार म्हणून दोन वेळा निवडून आलेले श्रीरंग अप्पा बारणे यांची पनवेल – उरण विधानसभा मतदार संघात कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अखण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघात महायुती कडून विद्यमान खासदार आणि सद्या शिंदेच्या सेनेत असलेले श्रीरंग अप्पा बारणे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बारणे यांनी या मतदार संघातून दोन वेळा खासदार पद भूषवलं आहे. तर बारणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील 3 तर रायगड जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या मावळ मतदार संघातुन या वेळी जवळपास 25 लाखाच्या आसपास मतदार आपला मतदानाचा हक्क बाजवणार आहेत.

यामध्ये पनवेल विधानसभा मतदार संघातील 5 लाख 65 हजार 915 मतदारांचा समावेश असून, त्या खालोखाल कर्जत विधानसभा मतदार संघातील 3 लाख 9 हजार, उरण मतदार संघातील 3 लाख 9 हजार 275 मतदारांचा समावेश असल्याने 2024 चा लोकसभेतील खासदार निवडण्यासाठी या मतदार संघातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने तिन्ही विधानसभा मतदार संघातील स्थानिकांचे दहा वर्षात न सुटलेले प्रश्न उचलून खा. बारणे यांना कोंडीत पकडन्याची रणनीती आघाडी कडून अखण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणी साठी पनवेल-उरणमधील स्थानिक आक्रमक आहेत. त्याच प्रमाणे सिडकोच्या नैना प्रकल्पा विरोधात ग्रामस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून, उरण पनवेल परिसरातील वायू प्रदूषण, प्रकल्प ग्रसतांच्या मोबदल्याचा विषय, पनवेल पालिका हद्दीतील नागरिकांच्या मालमत्ता कराचा विषय तसेच घोषणे नंतरही पनवेल परिसरात राखडलेल्या पासपोर्ट कार्यालयाचा विषयावरून खासदार बारणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जाऊ शकतो त्याच प्रमाणे वाढती महागाई, बेरोजगारी हे विषय देखील एजेंड्यावर घेण्यात येणार आहेत.
Exit mobile version