सामाजिक कार्यकर्ते आक्रमक; उपोषण करण्याचा इशारा
। नेरळ । प्रतिनिधी ।
उमरोली ग्रामपंचायतमध्ये भटक्या कुत्र्यांनी अनेकांचे लचके काढले आहेत. मात्र, त्यात एका चिमुकल्याचा बळी भटक्या कुत्र्यांच्या दंश झाल्याने गेला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पवार कुटुंब नोकरीसाठी मुंबईत आले आहे. हे कुटुंब कर्जत तालुक्यातील उमरोली गारपोळी येथील सोसायटीमध्ये राहत आहे. 3 जानेवारी रोजी समृद्धी कॉम्प्लेक्स पोद्दार भिवपुरी कर्जत येथे गुरू श्रद्धा सोसायटीत राहणाऱ्या ऋषिकेश देवेंद्र पवार (10) याच्यावर पिसाळलेला कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर उपचार करून सुद्धा मुलाच्या तब्येतीत कोणत्याही सुधारणा होत नव्हती. अखेर ऋषिकेश पवार याचा शनिवारी (दि. 31) रोजी मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात व गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या महाराष्ट्रात बिबट्याचा धुमाकूळ चालू असताना आता कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.
तरी प्रशासनाने भटके कुत्रे पाळणारे आणि भटक्या कुत्र्यांना खाऊ- पिऊ घालणारे यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. भटक्या कुत्र्यांचा वावर हा काही व्यक्तींमुळे म्हणजेच भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या व्यक्ती त्याला सर्वस्वी जबाबदार आहेत. समृद्धी कॉम्प्लेक्स पोद्दारमध्ये काही विशिष्ट माणसं भटक्या कुत्र्यांना जमा करून खायला घालणं सर्रास प्रकार चालू आहे. तरी प्रशासनाने संबंधित व्यक्ती व कुत्र्यांवर लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने बंदोबस्त करू वारंवार उमरोली ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली.
सदरचे प्रकरण ग्रामसेवक उमरोली यांना पत्राद्वारे कळवले आहे. अद्याप ग्रामसेवक यांनी कोणतीही कारवाई याबाबतीत केलेली नाही, संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही प्रशासनाला विनंती केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही तर उपोषणासाठी तहसील कार्यालयामध्ये बसावे लागेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी.
–अनिकेत अनंतराव सावंत
समृद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक /अध्यक्ष
