चौलच्या रामेश्‍वर पुष्करणीत रंगल्या जलतरण स्पर्धा

अमर पाटील प्रथम विजेता

| रेवदंडा | प्रतिनिधी |

स्वातंत्रदिनाचे औचित्याने प्रतिवर्षी आयोजीत करण्यात येत असलेल्या चौल रामेश्‍वर पुष्करणीत पोहण्याचा शर्यतीत खुल्या गटात अमर वासूदेव पाटील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर द्वितीय दतीय भारत कुथे, तृतीय भुषण शिर्के यांनी पटकाविले.

ही स्पर्धा एकूण 14 गटात घेण्यात आली. यामध्ये गट क्रमांक एक मध्ये मुले डबल फेरी प्रथम-अमर वासुदेव पाटील, व्दितीय – अमित वासूदेव पाटील, तृतीय-प्रथमेश गर्जे, गट क्रमांक दोन मध्ये मुले डबल फेरी प्रथम-भारत कुथे, व्दितीय-ॠतिक शिर्के, तृतीय-संदिप भोईर, गट क्रमांक तिन मध्ये प्रथम-स्वप्नील तांडेल, व्दितीय-ओंकार वादळ, तृतीय-आयुष चेरकर, गट क्रमांक चार मध्ये ओंढे बांधून मुंली प्रथम-सई संजय पिळणकर, व्दितीय -निरव वर्तक, तृतीय-साई मंगेश पिळणकर, गट क्रमांक पाच मध्ये ओंढे बांधून मुले प्रथम-अर्थव सचिन घरत, व्दितीय-ऐश्‍वर्य अनिल घरत, तृतीय-प्रिन्स भुषण पाटील, गट क्रमांक सहा मुले रिले प्रथम-आदित्य घरत व ओमकार जाधव, व्दितीय-हेमंत जाधव व विनायक नाईक, तृतीय-जितेंद्र जाधव व आर्य जाधव, गट क्रमांक सात मुले रिले प्रथम अमर पाटील व अमित पाटील, व्दितीय ॠतिक शिर्के व भारत कुथे, तृतीय-संकेत म्हात्रे व भावेश कडू, गट क्रमांक आठ मध्ये ओंढे बांधून मुली प्रथम गार्गी रविंद्र राऊळ, व्दितीय-आर्या विनोद नाईक, तृतीय-मानसी नरेश नाईक, गट क्रमांक नऊ मध्ये मुली खुला गट प्रथम-स्वराली बाळकृष्ण म्हात्रे, व्दितीय-स्वप्नाली बाळकृष्ण म्हात्रे, तृतीय- पुर्वा नंदकुमार टेकाळकर, गट क्रमांक दहा मध्ये मुले सिंगल फेरी प्रथम-भावेश निलेश कडू, व्दितीय-प्रथमेश गर्जे, तृतीय-दिवेश हाले, गट क्रमांक अकरा मध्ये मुले सिंगल फेरी प्रथम-संकेत म्हात्रे, व्दितीय-साईल सुरेश कुथे, तृतीय-दक्ष नाईक, गट क्रमांक बारा मध्ये रामेश्‍वर गट प्रथम-जितेंद्र जाधव, व्दितीय-हेमंत जाधव, तृतीय-ॠषीकेश घरत, गट नंबर तेरा सिंगल फेरी प्रथम-मानस टिवळेकर, व्दितीय-चिराग हाले, तृतीय संस्कार महेश पिळणकर व गट क्रमांक चौदा फायनल गट प्रथम-अमर वासूदेव पाटील, व्दितीय-भारत कुथे, तृतीय-भुषण शिर्के यांनी क्रमांक पटकाविले.

पुष्करणीच्या चारीही बाजूस प्रेक्षकांनी शर्यतीत भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहीत करून पोहण्याचा शर्यती पहाण्याचा आनंद घेतला. मित्रमंडळाचे वतीने सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले, उपस्थित जेष्ठ नागरिकांचे हस्ते स्पर्धेतील विजेत्याना रोख रक्कमेचे पारितोषिक तसेच स्मृती चषक प्रदान करण्यात आले.

Exit mobile version