। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईत बुधवारी दिवाळीच्या पूर्व संध्येला एक दुर्दैवी घटना घडलीआहे. एका किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. एकाच वेळी दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
उलवे येथील जावळे गावात किराणा दुकानात 5 किलोच्या 2 सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्यामुळे या आगीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकाला रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश असून त्यात एक 15 वर्षांची मुलगी असून एक 8 वर्षांचा मुलगा आहे. तसेच, कुटुंबातील आणखी एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.