रीटघरमध्ये घराला भीषण आग

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील रीटघर गावात एका घराला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

येथील काशिनाथ कानू पाटील हे आपल्या कुटुंबियांसमवेत झोपलेले असताना त्यांच्या घराला अचानकपणे आग लागली. ही आग शॉट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेजारील व्यक्तीच्या सतर्कतेमुळे याची माहिती घरातील व्यक्तींना देण्यात आली. तसेच, तातडीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना या आगी संदर्भात माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Exit mobile version