। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे असलेल्या एका टायरच्या गोदामाला आज अचानकपणे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. पनवेल जवळील पळस्पे येथील दत्ता स्नॅक्सजवळ असलेल्या पीके वाईन्स शेजारील एका टायरच्या गोदामात भीषण आग लागली आहे. या परिसरात दाट धुराचे लोट पसरले असून, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस व वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी रवाना होऊन वाहतूक कोंडी दूर केली.







