। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्यांच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर अनोळखी बेवारस व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे, अंगात नेसून काळ्या रंगाची ट्रॅक पॅट व मळकट पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला, कपाळाला व नाकाला खरचटलेले, अंगाने मध्यम असे वर्णन आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.







