। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली येथे मॅकडोनाल्डच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी ‘अंदर बाहेर’ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हे शाखा कक्ष 3 ने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 27 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले. गुन्हे शाखा कक्ष 3ला कळंबोली मॅकडोनाल्डच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी अंदर बाहर हा पत्त्यांचा जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी रियाज सनसुर खान, हकीम अमीर मंडळ, गोविंदा सुखदेव गोरे, अनवर अकबर शेख, धर्मापद टेंभे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून 27 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत.





