आक्षीच्या साई मंदिरात चोरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील साई मंदिरातून भरदिवसा चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली. मंदिरातील घंटा आणि समई चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आक्षी येथील साई मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. मंदिरातील समई आणि घंटा चोरीला गेल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाक्या-नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकासह भरारी पथक तैनात करण्यात आले आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम व इतर विभागातील कर्मचार्‍यांसह पोलीसही त्यांच्यासोबत असतात. निवडणुकीच्या निमित्ताने काही गैरप्रकार होऊ नये यासाठी पथक तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात इतका कडेकोट पहारा असतानाही आक्षीतील मंदिरातून ऐवज लंपास करून चोर पसारही झाले. त्यामुळे मालमत्ता सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे अलिबाग पोलीस लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version