अमरावतीत होणार तिरंगी लढत

| मुंबई | वृत्तसंस्था |

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे जिथं नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे असा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात सामना होणार आहे. पण या दोन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इथं प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंच्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे.दिनेश बूब यांना प्रहार संघटनेचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळं अमरावती लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होऊ शकते.

नवनीत राणा आणि रवी राणा हे अमरावतीतले हे दाम्पत्य सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात खुपतं आहे. कारण, ज्या पक्षानं राणांना उमेदवारी दिली, त्याच राणांच्या कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यावरुन नुकतंच बच्चू कडूंनी भाजपवर घणाघाती टीकाही केली होती. दिनेश बूब यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे. सर्वांशी जुळून घेऊन काम करण्यात त्यांची हातोटी आहे. प्रहार संघटनेत प्रवेश करण्याआधी ते ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक होते. अमरावती महापालिकेत ते चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. 2002 ते 2007 या काळात त्यांनी आमरावतीत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. 2007 ते 2012 श्रीकृष्ण पेठ, अमरावती (शिवसेना), 2012 ते 2017 अंबापेठ, अमरावती (अपक्ष), 2017 पासून जवाहर स्टेडीयम, अमरावती (अपक्ष) म्हणून ते निवडून आले आहेत.

Exit mobile version