। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिकमध्ये बसची धडक लागून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपोमध्ये आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास हि भीषण अपघाताची घटना घडली आहे. सानवी सागर गवई (5) ही आपल्या आजोबांबरोबर बस डेपोच्या आवारात असणाऱ्या त्यांच्या चहाच्या टपरीवर जात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या सिटी लिंक बसने तिला मागून जोरदार धडक दिली असता ती खाली पडून बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेले आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर, तिचे आजोबा किरकोळ जखमी झाले आहेत.