टोलनाक्याच्या डिवायडरला ठोकर; कार चालकाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव वेगाने जाणार्‍या हुंडाई आय 20 गाडीची पनवेल जवळील खारपाडा येथील टोलनाक्याच्या डिवायडरला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांनतर गाडी जाळून खाक झाली आहे. विजय शंकर राठोड ( 44) पेण त्यांच्या ताब्यातील होंडाई कंपनीची आय 20 कार (एमएच-6-बीयु-0875) ही भरधाव वेगात रस्ताच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करून खारपाडा टोलनाका येथिल डिवायडरला ठोकला. या अपघातात गंभिर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडला. या गुन्ह्याची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version