। आंबेत । वार्ताहर ।
आंबेतमध्ये एक ट्रॅक्टर चालकाने मद्यपान करून विजेच्या मुख्य पोलाला धडक दिल्याची धक्कादायक शुक्रवारी रात्री बाब घडली आहे. यामुळे आंबेत नवेनगर परिसरातील संपूर्ण वीज रात्रभर गायब होती.
आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी आलेला सदर ट्रॅक्टर क्रमांक एमएच 06 सी 9943 रात्री उशिरा आपल काम आवरून शासकीय विश्रामगृह परिसरात जात असताना दारूच्या नशेत आंबेत नावेनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलाला धडक दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटना प्रसंगी वीज अभियांत्रिकी सौरभ जगताप रामेश्वर यांनी धाव घेऊन सदर घटनेचा प्रकार पोलिसांना सांगितला. या अपघातानंतर हा चालक मात्र फरार झाला असून त्याचा शोध आंबेत पोलीस घेत आहेत.







