। खांब-रोहे । वार्ताहर ।
मोसयी पावसाचे आगमन होताच शेतकरी वर्गाने खरिपाच्या भात पेरणीच्या कामास प्रारंभ केला असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असणार्या शेतकरी वर्गाला पावसाच्या या आगमनाबोबरच मोठे समाधान वाटू लागले आहे. गेली अनेक दिवस पाऊस वेळेवर येईल या आशेवर असणार्या शेतकरी वर्गाच्या चेहर्यावर निराशेचे भाव दिसून येत होते. तर वरकस पट्टा व धुळवाफ्याची पेरणी करून शेतकरी वर्ग बरेच दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असतानाच दोनच दिवसापासून पावसाने थोडेफार बरसायला सुरूवात केल्याने शेतकरी वर्गाला चांगलेच समाधान वाटले आहे. तर ठिकठिकाणी शिल्लक राहिलेल्या भाताच्या पेरणीच्या कामांनी हळूहळ वेग पकडायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला पेरणी केलेल्या शेतकरी वर्गाने शेतीतील तण काढणे, बांधबंदिस्ती करणे, राब भाजणे आदी कामे करण्यात शेतकरी करताना दिसत आहे.