| चणेरा | प्रतिनिधी |
कृषी दिनाच्या निमित्ताने रोहा तालुक्यातील राजिप वाशी शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन भात लागवडीचे प्रत्यक्ष अनुभव घेतला. मुख्याध्यापक शर्मिला कोठेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
‘पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा’ या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शेतीच्या मुळाशी नेणयात आले होते. विद्यार्थ्यांनी शेतात चिखलात उतरून स्वतःच्या हाताने भात लागवडीची प्रात्यक्षिके केली. मातीची मशागत, रोपे लावणे, पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक खतांचा वापर यासंदर्भातील माहिती शेतकरी बांधव व कृषी सहाय्यकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी गायत्री सोनवने, पुजा जंगम तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.