धैर्य सामाजिक संस्थेतर्फे शाळेत फिरते संग्रहालय

| पोलादपूर | वार्ताहर |

तालुक्यातील धैर्य सामाजिक संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या फिरते संग्रहालय या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा चिरेखिंड या पोलादपूर तालुक्यातील शाळेत ऐतिहासिक शस्त्र, नाणी, 40 विविध देशांतील नाणी, नोटा, यांचे संग्रह प्रदर्शन भरविण्यात आले. या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, शिक्षकवृंद ज्ञानेश्वर उतेकर, मुख्याध्यापक सिताराम जाधव, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक ज्ञानेश्वर उतेकर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या सामाजिक कार्याबाबत माहिती दिली तसेच संस्थेचे सर्व विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आभार व्यक्त केले. अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी विद्यार्थ्यांचे या संग्रहालय उपक्रमातील वस्तूंची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी हा आणखी एक स्तुत्य उपक्रम तालुक्यात सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले.

Exit mobile version