दहिवली रस्त्यावर कोसळले झाड

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातील दहिवली भागातील ललानी परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळले होते. त्यामुळे ललानी रोड वाहतुकीस बंद झाला होता आणि त्याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी करण्यात आल्या हात्या. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून तात्काळ ते झाड रस्त्यातून बाजूला करण्यात आले.

कर्जत नगरपरिषद हद्दीतील ललानी रस्त्यावर मोठे झाड पडल्याने हा रस्ता काही काळ बंद झाला होता.रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनांना अन्य मार्गाने आपल्या निश्‍चित स्थळी जावे लागत होते. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना संपर्क साधून माहिती दिली. त्यांनतर पालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले. यावेळी, स्थानिक नागरिकांसह पालिकेचे माजी स्वीकृत सदस्य संकेत भासे यांनी देखील तेथे उपस्थित राहून रस्त्यातून झाड बाजूला करून घेण्यासाठी सहकार्य केले.

Exit mobile version