। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
गोवे – कोलाड मार्गावर महिसदरा नदीच्या तीरावरील रस्त्यावर मोठे झाड पडले. त्यामुळे नागरिकांचा चार तास खोळंबा झाला. दोन दिवसापासून वादळ वार्यासह तुफान पडलेल्या पावसामुळे हे झाड पडले. कोलाडला जाणारे रिक्षा चालक, धाटाव कंपनीत कामावर जाणारे कामगार, दूध व्यावसायिक व कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिकांचा जाण्यायेणचा मार्गच बंद झाला. चार तासानंतर तटकरे पॉलिटेक्निक कॉलेजचे कर्मचारी यांनी रस्त्यावर पडलेले झाड मशीनच्या सहाय्याने कापून काढले आणि मार्ग मोकळा केला.