माथेरान मध्ये घरावर झाड कोसळले

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये गुरुवारी दुपारी अनंता मोरे यांच्या घरावर मोठाले झाड कोसळले. सर्वजण घऱात असताना अचानकपणे असाना जातीच्या झाडाची मोठी फांदी घरावर कोसळली. यामध्ये घराच्या भिंतीच्या दगडी कोसळल्या त्यातील एक दगड लाहून महिला जखमी झाली. जीवित हानी झाली नसली तरी घरातील सर्वच सामानाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

शामक बंगला (बाटली बॉय) येथे माळी कामगार म्हणून राहत असलेल्या घरावरहे झाड कोसळले.दुपारची वेळ असल्याने घरातच असलेल्या उर्मिला उमेश मोरे हिच्या डोक्याला दगडाचा मार लागला आहे, तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. स्थानिक शैलेंद्र दळवी, दत्ता सनगरे आण्णा शिंदे, ओंकार आखाडे, वैभव परब, निलेश मढये ,परशुराम घुटे आणि परशुराम पांगसे, विजय चौहान आदींनी घरावरील झाड बाजूला करण्यास मदत केली.

Exit mobile version